अंतहीन...


अलविदा म्हणताना...
वेदना अंतहीन..
'क्षण' दोन क्षणांचा..
हुरहूर अंतहीन..

नुसतेच कसे गिळावे..
हुंदके कंठातले....
हसरे डोळे जरी..
आसवे अंतहीन..

पाठमोरी आकृती
ठिपका होतांना..
परिघात अडकले..
जीवन अंतहीन..

तू असलास जरी..
परक्या बाहुपाशात..
तुझाच मजला...
आधार अंतहीन..

नजरानजर क्षणाची..
मन रे अडकले..
तो विसरायाची..
साधना अंतहीन..

मोहाच्या चांदराती..
बेसावध चांदण्या..
फसव्या स्वप्नांचा
पाठलाग अंतहीन..

आज पुन्हा एकदा..
एकांताची साथ..
विस्कटलेल्या बिछान्याचे.
भास अंतहीन..

तुटता तुटेना..
ताण अंतहीन..
सुटता सुटेना..
प्राण अंतहीन..

येऊ दे ते ..
मरण अंतहीन..
जळू दे ते..
सरण अंतहीन..




कवी: संकेत पारधी

६ टिप्पण्या:

Deepak Parulekar म्हणाले...

येऊ दे ते ..
मरण अंतहीन..
जळू दे ते..
सरण अंतहीन..

मस्तच ! सही रे भावा !

हेरंब म्हणाले...

प्रचंड डिप्रेसिंग !!!!

ही पावती आहे ती कवितेत मांडलेल्या जिवंत वर्णनासाठीची !!

Suhas Diwakar Zele म्हणाले...

मस्त जमलीय... !!

तुटता तुटेना..
ताण अंतहीन..
सुटता सुटेना..
प्राण अंतहीन..

बहोत खुब !!

davbindu म्हणाले...

स्वामी ,कविता छान झाली आहे भिडते मनाला ...लगे रहो ...

क्रांति म्हणाले...

पाठमोरी आकृती
ठिपका होतांना..
परिघात अडकले..
जीवन अंतहीन..

हं........... उत्तम मांडणी.

Unknown म्हणाले...

mast..touchy!