"ये उपरवाला भी अजीब है ना चचाजान?"
समोर बसलेल्या सत्तरीच्या घरातल्या, किमान अर्धाफुट दाढी असलेल्या, सुरकुत्यांनी व्यापलेल्या त्या कनवाळु चेहर्याकडे बघत त्यानेच दिलेल्या गमछाने केस पुसत मी विचारले. तसा तो गोड म्हातारा मिस्कील हसला..
क्युँ बेटेजान, डर गये?
नही चचाजान, मै क्युँ डरुंगा, मै तो यहाँ आपके सामने, आपकी इनायतसें, हिफाजतसे हूं! लेकिन एक नजर बाहर डालके देखीये....! हर तरफ आतंक मचा रख्खा है बारीशने! पता नही आज कितनी माँओने अपने बच्चे खोये होगे, कितने बच्चे अपनी माँ की इंतजार करकरके थक गये होंगे! पता नही कितनी सुहागनोनें अपना सुहाग खोया होगा आज!
क्या सचमें भगवान है?
माझे डोळे नकळत भरून आले होते. तसे चाचाजी उठले, माझ्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवला आणि उठून खिडकीजवळ गेले. खिडकीतून बाहेर बघत मला जवळ बोलावले.
"वो देखो बेटा... ऐसा नजारा देखा है कभी?"

"और क्या देखना बाकी है चचाजान, कुछ देर पहले मै भी उनमेंसे एक था! आपने अगर हम लोगोंको घर के अंदर ना लिया होता तो अब भी मैं वहीं अपनी मौत सें दो हात कर रहा होता....!"
माझी नजर खोलीकडे वळली. त्या १० बाय १२ च्या खोलीत जवळ जवळ १३-१४ माणसे दाटीवाटीनं उभी होती. पावसाचा सडाका वाढल्यावर चाचाने मोठ्या मनाने दार उघडून आत घेतलेल्या लोकापैकी होते ते. त्यातच चाचाच्या घरातले सात सदस्यही होते. मी ही जणु त्यांच्यापैकीच एक झालो होतो एका क्षणात. २-३ तासांपूर्वी मरोळच्या एका क्लायंटच्या ऑफीसात बसून त्याच्याशी ऑर्डर निगोशियेट करत होतो. शेवटी फायनल करुनच उठलो. त्या आनंदातच बाहेर आलो तेव्हा पावसाला बर्यापैकी सुरूवात झाली होती. म्हणून थोडा वेळ तिथेच थांबलो. पण पाऊस काही थांबायचे नाव घेईना, म्हणून तसाच धडपडत बाहेर पडलो. पण रोडवर सगळी वाहने अडकून पडलेली. पाणी गुड्घ्याच्या वर लागायला लागले होते. पाऊस प्रचंड कोसळत होता. तसाच चालत, धडपडत साकीनाक्याकडे निघालो.
![]() |
तोंडचं पाणी पळवणारं पाणी |
"अरे भाई, आगे जाने से कोइ फायदा नही है! सफेद पुलके एरियामे सब चोकप हो गया है! पानी कमरतक पहुंच रहा है! कोइ बस नही जायेगी! "
साकीनाक्याकडून आपली बाईक ढकलत निघालेल्या एका तरुण मुलाने सांगितले तसे काळजात धस्स झाले. पहिला विचार आला तो घरी काय झाले असेल? आण्णा आले असतील का? विनू कामावरून परत आला असेल का? सायली प्रचंड घाबरली असेल. लग्नाला अवघे सहाच महीने झाले होते आमच्या.......!
सुदैवाने घर तिसर्या मजल्यावर असल्याने घरात पाणी शिरण्याची भीती नव्हती. पण मुळात आता आपण घरापर्यंत पोहोचू की नाही याचीच शाश्वती नव्हती. सगळीकडे लोकांचा आरडा-ओरडा ऐकू येत होता. पाण्याचा स्तर वाढतच चाललेला. तेव्हा जवळ मोबाईलही नव्हते. घरी फोन करावा म्हणलं तर फोन लाईन्स अस्ताव्यस्त झालेल्या. निसर्गाचा एवढा प्रचंड उद्रेक कधीही अनुभवला नव्हता. तरी तसेच कंबरभर पाण्यात, हो गुडघ्याचे पाणी आता कंबरेपर्यंत पोचले होते, सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याची प्रत्येकाची धडपड चालू होती. एव्हाना मी.. आम्ही साकीनाका ओलांडून सफेद पुल मार्गे बैल बाजारच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहाला आडवे जात पुढे सरकत आलो होतो. पाऊस अजून वाढला. त्याच वेळी सफेद पुल आणि बैल बाजाराच्या मध्येच कुठेतरी त्या झोपडपट्टीत राहाणार्या अब्बासमियांनी घराचे दार उघडून आम्हाला आत घेतले होते. त्यांच्याच घराच्या खिडकीत उभे राहून मी पुन्हा एकदा बाहेर चाललेले पावसाचे तांडव बघत होतो.
या झोपडपट्टीतली घरे येता जाताना बर्याचवेळा पाहीली असतील तुम्ही. खाली एक छोटीशी खोली, तिथेच शेजारी वर जाणारी एक लोखंडी शिडी उभी करून वर एक दहा बाय दहा किंवा बाराची खोली. या झोपडपट्टीतली बरीचशी घरे अशीच आहेत.
![]() |
पाणीच पाणी चहुकडे |
चाचांच्या घराची खालची खोली तर पाण्यातच गेली होती. त्यांच्या घरातल्या सात जणांसकट ते वरच्या खोलीत जीव मुठीत धरून बसलेले. पण तशा अवस्थेतही त्यांच्यामधला माणूस जिवंत होता. बाहेरच्या संकटात अडकलेल्यांना जमेल तेवढी मदत करण्याची त्या कुटूंबाची वृत्ती साक्षात काळालाही मान खाली घालायला लावेल एवढी थोर होती. एव्हाना त्या छोट्याशा खोलीत पंचवीसच्या वर माणसे जमा झाली होती. पण चाचाच्या किंवा त्याच्या कुटूंबियांच्या डोळ्यात थोडीसुद्धा त्रासाची, कुरकुरीची भावना दिसत नव्हती. अशावेळी आपला खुजेपणा प्रकर्षाने जाणवायला लागतो.
"उसे मत कोंसो बेटेजान! वो तो अपना काम ठिक ही करता है! ये तो हम इन्सानही है जो अपने फर्जसें चुकते रहते है और जब जानपें आ बनती है तो उस उपरवालेको कोंसना चालू कर देते है!:
किती खरं बोलत होते चाचा! वेळीच जर गटारे साफ़ केली गेली असती, मिठी नदीतला गाळ जर साफ़ केला गेला असता तर झालेली हानी आहे त्यापेक्षा खुप कमी असली असती.
![]() |
मिठी नदी |
मी नकळत मान डोलावली. चाचा पुढे बोलतच होते...
"बेटा, वो उपरवाला बहुत बडा कारसाज है! ये बंबई हमेशाहीसे हिंदु-मुस्लीम दंगोके लिये बदनाम रही है! वो देखो और बताओ मुझे उसमें कौन हिंदु है और कौन मुसलमाँ? कौन सिख है और कौन इसाई? आज वहाँ सिर्फ और सिर्फ इन्सान नजर आ रहे है! देखो...देखो... हर तरफ सिर्फ और सिर्फ इन्सान!"
![]() |
मानवी साखळी |
मी बाहेर बघीतले. लोकांनी रस्त्याच्या मधोमध एक रांग बनवली होती. पाणी कमीजास्त होत होते. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत तर काही ठिकाणी छातीपर्यंतही आले होते. पण कुणालाही त्याची फिकर नव्हती. एकमेकांचे हात हातात धरून साथी हाथ बढाना करत हळु हळु रांग पुढे सरकत होती. एव्हाना मदतीचे हातही पुढे येऊ लागले होते. रांगेतून पाण्याच्या बाटल्यांचे कार्टुन्स पुढे पास केले जात होते. पावसाच्या त्या तांडवाने माणसातला माणूस जागा केला होता.
![]() |
मदतीचा हात |
"देखा बेटा, उपरवाला बहुत बडा कारसाज है! वो गलत हो ही नही सकता....!"
चाचाच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहायला सुरूवात झाली होती. मी पुढे होऊन चाचाला कडकडून मिठी मारली. त्याला म्हणालो.
"चचा, मै अपना बॅग यहाँ छोडके जाता हूँ, पानी कम होने के बाद लेके जाऊंगा !"
"अरे ऐसे तुफ़ानमें बाहर कहा जाओगे बच्चे, वहा तो मौत नाच रही है!"
खोलीतले सगळे माझ्याकडे ’हा वेडा आहे की काय? अशा नजरेने बघायला लागले होते. पण मला आता त्या मुसळधार पावसाची भिती वाटत नव्हती. मी माझ्या आयुष्यातला सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र पाऊस पाहीला होता. अब्बासचाचाच्या डोळ्यात !
"चचा, आज मेरा भी दिल कर रहा है! सोचता हूँ एकबार महसुस कर ही लू."इन्सान बनना क्या होता है?" कल परसो आऊंगा जरुर आपको मिलनेके लिये और बॅग लेने को! तब तक शुक्रिया और खुदा हाफीझ ! शुक्रीया जान बचानेका नही कर रहा हूँ क्योंकी जानता हूँ आप कहोगे, ये तो मेरा फर्ज था! शुक्रीया कह रहा हूँ एक नया विश्वास दिलाने के लिये, इन्सानीयत का ये अनोखा पहलू सिखाने के लिये! जुलाई की ये छब्बीस तारिख तमाम उम्र याद रहेगी मुझे! इस दिनने मुझे एक और परिवार दिया है! खुदा हाफिझ !! "
आणि पुढच्याच क्षणी मी बाहेरच्या जीवन-मृत्युच्या संग्रामाचा एक घटक बनून गेलो.
(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)
*********************************************************************************************************************
लेखक: विशाल कुलकर्णी
०९९६७६६४९१९
१० टिप्पण्या:
विशालदा एकदम थरारक अनुभव आणि उत्तम मांडणी.. !!
त्या दिवसाच्या आठवणी आठवल्या की अंगावर सरकन काटा उभा राहतो... :(
सुझेला अनुमोदन ! ++१
विशालदा ...... एका विलक्षण अनुभवाचे उत्तम वर्णन !
खरंच विलक्षण अनुभव. चाचांना आणि माणुसकीला सलाम.
मनःस्पर्शी. छान झालाय लेख.
त्या पावसात मीपण अडकले होते आणि अशाच अनोळखी लोकांनी केलेल्या मदतीने मित्राच्या घरी पोहोचले होते...त्या पावसामुळे का होईना पण सगळ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले...खूप छान झालाय लेख...
विशालदा, त्या दिवसाचा तो विलक्षण अनुभव योग्य प्रकारे मांडलास ...
>>>"उसे मत कोंसो बेटेजान! वो तो अपना काम ठिक ही करता है! ये तो हम इन्सानही है जो अपने फर्जसें चुकते रहते है और जब जानपें आ बनती है तो उस उपरवालेको कोंसना चालू कर देते है!
ते चाचा अगदी अगदी योग्य अस बोलले ..
सुंदर. सफेद पूल आणि बैल बाजार हा माझ्या माहितीचा एम वसनजी म्हणजे कुर्ला अंधेरी मार्गावरला प्रदेश अचानक डोळ्यांसमोर जिवंत झाला. त्या दिवशी मी अंधेरी एम आय डी सी तून चालत अंधेरी रेलवे स्थानक आणि रेलवे रूळावरून चालत मालाडला गेलो होतो. त्याही आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
मन:पूर्वक आभार मंडळी ! :)
२६ जुलै २००५ चा तो दिवस खरोखर खुप काही शिकवून गेला. अविस्मरणीय असाच अनुभव होता तो.
खासच लिहिलास रे अनुभव! माणसाची खरी ओळख अशाच वेळी होते.
विशाल,
अगदी नेटकं मांडलंस सारं.
टिप्पणी पोस्ट करा