पाऊस आणि मी

तुझ्या  स्वागतासाठी
हिरवाईने नटते अवघी सृष्टी
आम्ही आलो काय, गेलो काय
दिसतात तेच चेहरे दु:खी कष्टी
.
तू आपल्या मर्जीचा मालक
पाहिजे तेव्हा पाहिजे तसा येतो
आम्ही मात्र अजाण बालक
आयुष्याचा गाडा कसातरी पुढे नेतो
.
तू कसाही कोसळलास तरी
कोणीतरी पाहतच असते  तुझी  वाट
कोणासाठी कितीही केलं तरी
आमची नेहमी लागत असते वाट
.
पण तू सोबतीला असलास की मला
उगाच हसायचे सोंग घ्यावे लागत नाही
तुझी  साथ मग हवीशी वाटते, कारण
तेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही
.
मग कधी माझं दु:ख जाणवल्यावर
तू वेड्यासारखा  कुठेही पडत असतोस
आणि माझे अश्रू सुकले तरी
तू मात्र नेहमीच रडत असतोस

कवी: देवेंद्र चुरी

१२ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

देवेन इज बॅक वुईथ बँग..

मस्तच कविता रे..

सुहास झेले म्हणाले...

लई भारी कविता भावा,
जरा रेग्युलर लिवत रावा...!!

davbindu म्हणाले...

हेरंब ,धन्स यार ....

सुझे ,जरूर प्रयत्न करू रेग्युलर लिवायचा ... :)

दीपक परुळेकर म्हणाले...

लईच !
मस्त कविता भावा !!
शेवटच्या ओळी जाम आवड्या! :)

दीपक परुळेकर म्हणाले...

लईच !
मस्त कविता भावा !!
शेवटच्या ओळी जाम आवड्या! :)

क्रांति म्हणाले...

खूपच खास! शेवट झकास.

davbindu म्हणाले...

दीपक ,धन्स रे भावा...
क्रांतीताई, तुझ्याकडून खास अशी प्रतिक्रिया मिळणे मी माझा बहुमान समजतो....

श्रेया म्हणाले...

"तुझी साथ मग हवीशी वाटते, कारण
तेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही"

या ओळी चार्ली चॅप्लीनच्या एका वचनाची आठवण देऊन गेल्या. बाकी कविता मस्तच. लिहित रहा रे !

davbindu म्हणाले...

"I always like walking in the rain, so no one can see me crying."
— Charlie Chaplin

चार्लीची फिलॉसॉफी जबरदस्तच आहे ...

प्रतिक्रियेबद्दल धन्स श्रेयाताई, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद असल्यावर नक्कीच लिहित राहीन ..

महेश सावंत म्हणाले...

खूप छान लिहिले आहे

davbindu म्हणाले...

धन्स महेश ....

ulhasbhide म्हणाले...

छान ... शेवटचं कडवं अधिक आवडलं.