अ‍ॅपोकॅलिप्टो !!!!

बर्‍याचदा एखादा चित्रपट पाहताना अपेक्षा ठेवून पाहीला तर बहुतांशी वेळा तो फुसका बार ठरण्याची शक्यता जास्त असते.... पण नावाजलेला दिग्दर्शक म्हंटला की.... माझ्या डोक्यात त्या चित्रपटाविषयी अपेक्षांचे डॊंगर उभे राहतात....  असाच हा एक चित्रपट....!
अ‍ॅपोकॅलिप्टो !!!!
मेल गिब्सनचा हा चित्रपट........ माझ्यासाठी एक जबरदस्त अनुभव ठरला....

चित्रपटाची सुरूवात एका रानडुकराच्या शिकारीपासून होते..... जी आदिवासी जमात
ही शिकार करते त्या आदिवासी जमातीवर दुसरी प्रबळ जमात आक्रमण करते.... त्यातील स्त्री- पुरुषांना पकडून घेऊन जाते... त्या पुर्वी जग्वार पॉ ( हिरो ) त्याच्या बायको आणि छोट्या मुलाला एका विहीरी सदृश्य जागेत लपवतो.... ती गर्भवती.... जवळ जवळ ९ महिन्यांची.... त्या दुसर्‍यांपैकी एकाच्या, त्यांना तिथे लपवलेले आहे ते लक्षात येते.... तो त्या घळीत सोडलेली दोरी तोडून टाकतो...
त्यांना पकडून नेत असताना... रस्त्यात ... एक लहान मुलगी.... तिच्या आईकडे जाऊ पाहाते.... तिला ते... हातातल्या दंडूक्यांनी ढकलतात..... ती पुन्हा पुन्हा येते... त्यांच्यातील एक जण तिच्या छातीवर.... दंडूक्याने जोरात प्रहार करतो.... तिच्या चेहर्‍यावर काहीही भाव उमटत नाहीत ... पण आपल्याला जाणवत राहते...की तिला जबरदस्त मुका मार लागला आहे....
ती शापवाणी उच्चारते....... 
" तो जग्वार बरोबर येईल....एकाला साप चावेल.. जग्वार पॉ तुमचा नाश करेल..." वगैरे वगैरे..

पकडून नेलेल्यांपैकी स्त्रियांची विक्री होते.... पुरुष नरबळी करिता नेतात.... त्यात अगदी सुदैवाने सुर्यग्रहण लागल्यामुळे जग्वार पॉ  बळी जाता जाता राहतो.. ..  त्याला आणि इतरांना एका मैदानात नेऊन, पळून जाण्याची संधी दिली जाते... मागून दुसरी जमात भाले , बाण मारणार.... मैदानाच्या दुसर्‍या टोकाला त्या जमातीच्या सरदाराचा मुलगा टणक हत्यार घेऊन उभा...... बाण ... भाल्यातून अर्धवट जखमी ... वाचलेल्यांना तो मारणार...जग्वार पॉ आणि त्याचा जोडीदार तिरकस पळण्याची युक्ती  वापरतात... पण आक्रमक टोळीच्या सरदाराचा एक बाण जग्वार पॉला लागतोच .... जखमी होऊन पडलेल्या जग्वार पॉला मारायला तो सरदाराचा मुलगा  येतो.... पण त्याने असे सहजासहजी मारले हिरोला तर मग अर्थ काय राहिला....?  लागलेल्या बाणाचे टोक मोडून जग्वार पॉच त्याला मारतो..... आणि कसाबसा... पुढच्या शेतात शिरतो...... मग सुरु होतो थरार....... पाठलागाचा.... जगण्याचा !

ज्या प्रत्येक वेळी त्याच्या जीवावर बेततं ... त्याला त्याची वाट पाहात घळीत अडकलेली पत्नी आणि मुलगा आठवतात.... आणि तो पुन्हा.... वाचण्यासाठी धडपड करत राहतो....

यात काही दृश्ये अक्षरश: अंगावर येतात... काटा आणतात...

१) खरखुरा जग्वार ( काळा चित्ता ) जग्वार पॉच्या जेंव्हा मागे लागतो.... तेंव्हा विरूध्द टोळीचा एक तरूण जग्वार पॉला फक्त पाहून दुसर्‍या वाटेने पळत मध्ये येतो..... चित्ता त्याच्याच अंगावर उडी मारतो.... तरूणाचा चेहरा चित्त्याच्या जबड्यात सापडतो.... तो मारला जातो... त्याच वेळी त्या जमातीचे इतर साथीदार येऊन भाल्यांनी हत्यारांनी त्या चित्त्याला तिथल्या तिथे भोसकून मारतात.... त्या तरूणाचा विद्रूप झालेला चेहरा ... आणि भोसकलेला चित्ता.... काटा येतो अंगावर... ( माझ्यातरी आला )...
२ ) जग्वार पॉ त्यातल्या एकाला... मारतो...... { मला आता नीट आठवत नाही - चित्रपट पाहून जवळ पास वर्ष झाले आहे.... ;) } मला वाटतं ... बहुधा त्याचे नाव " मिडल आय " होते..... ज्याने जग्वार पॉच्या वडिलांना त्याच्या डोळ्यांदेखत, मुद्दाम केवळ ते ह्याचे वडील आहेत असे कळाले म्हणून मारले होते तो हा... मिडल आय.......जग्वार पॉला कायम त्रास देत असणारा ....  
मिडल आयचा वार चुकवून त्याच्या डोक्यावर जेंव्हा जग्वार पॉ टणक हत्याराने....       वार करतो.... रक्ताच्या धारा.... अक्षरश: स्प्रे ऊडावा तशा उडतात....आणि त्या देखील..... रक्ताचे अभिसरण होते.... नाडीचे ठोके पडतात ना त्या गतीने.. कमीजास्त होत...... 

३) विरूध्द टोळीचा सरदार... यांच्या जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकून मरतो.....तेंव्हा त्याच्या पाठीतून बाहेर आलेल्या अणकुचीदार टोकावर लटकलेले त्याचे मांस....

४) जग्वार पॉची बायको घळीत असते......ती घळ पाऊस सुरु झाल्यावर भरायला लागते....ही मुलाला.. खांद्यावर बसवते..... पाणी वाढतच जातं ...  हाईट म्हणजे ती पाण्यात ..... चित्रपटात अक्षरश: प्रसूत होते..... ते नाळ असलेले नवजात बाळ....

खूप सारे प्रसंग आहेत ... हे चारच पुरेसे आहेत इथे कल्पनेसाठी..


या चित्रपटात ती पिरॅमिड सदृश्य सुर्यमंदिरावर सुर्याला नरबळी द्यायची पध्दत.... पिरॅमिड म्हंटले की ( किमान ) मला फक्त इजिप्त माहिती..........अगोदर मला वाटले.... पुरातन  संस्कृती दाखवायची म्हणून घेतली असेल..... मी नुकतेच डॉ. मीना प्रभूंचे " मेक्सिकोपर्व " वाचले.... त्यात ह्या संस्कृतीचे सगळे वर्णन आहे.... माया संस्कृती च्या अगोदरची  " आस्तेक संस्कृती " ती ही. त्यांच्या पध्दती जशाच्या तशा चित्रपटात दाखवल्या आहेत....  - मेक्सिकोत समुद्रमार्गे स्पॅनिश येतात....तेही चित्रपटाच्या अगदी शेवटी येते....
जग्वार पॉच्या  पाठलागावर आलेले, आक्रमक जमातीचा सरदार आणि त्याच्या बरोबर असणारे ८/१० जण त्या मुलीच्या शापाप्रमाणे मरत जातात... फक्त दोघे राहतात..... 
वाचलेला जग्वार पॉ भर पावसात त्या घळीपाशी येतो.... तेंव्हा त्याला दिसते..... मुलाला खांद्यावर बसवलेली ..... नवजात शिशूला हातांनी पाण्यावर धरलेली.... जिचा चेहरा फक्त श्वास घेण्यापुरता पाण्यावरती आहे.....अशी त्याची प्राण डोळ्यात आणून वाट पाहात असलेली पत्नी......

शेवटी जग्वार पॉ बाळाला पाठीवरच्या झोळीत बांधून दुसर्‍या मुलाशी थोडासा खेळत हातात भाला घेऊन चाललेला असतो ... त्याच्या मागे त्याची पत्नी येते असते...... त्यांना एका कोपर्‍यातून जंगलाला लागून असलेला समुद्र आणि किनार्‍यावरील जहाजे दिसतात.... ते थांबतात.... त्याची पत्नी त्याला विचारते .." ते काय आहे... आपण तिथे जायचे ?"  तो... क्षणभर... शांत उभा राहतो.... मग ... " ते आपल्यासाठी नाही...., आपल्याला जंगलच बरे आहे.. "  तो जंगलाची पुन्हा निवड करून चालायला लागतो....  तिथे चित्रपट संपतो.....  
आपल्या मनात.... जग्वार पॉची विजीगिषा..... जगण्याची...,लढण्याची जिद्द भरून राहते....

बर्‍याच दिवसांपासून या चित्रपटावर लिहायचे मनात होते.... वर्षा अंकाच्या निमित्ताने... वेळ काढून लिहून टाकले..... 
मी हा चित्रपट बघून जवळजवळ वर्ष झाल्यानंतर  हा परिचय लिहितोय त्यामुळे यातील काही संदर्भ पुसट झाले असण्याची शक्यता आहे......

    लेखक: समीर पु. नाईक

१० टिप्पण्या:

सिद्धार्थ म्हणाले...

अरे मी नुकताच हा चित्रपट HBOवर पाहिला. सुरुवात नाही पाहिली त्यामुळे आधीची कथा आणि पात्र परिचय नव्हता. तो चित्त्याचा आणि नरबळीचा प्रसंग पहायला नाही मिळाला पण शेवटचा पाठलाग, विरुद्ध टोळीला जग्वार मारतो आणि अविस्मरणीय म्हणजे त्या विहिरीत त्याची बायको प्रसूत होते तो क्षण. मुल जन्माला येते ते चित्रीकरण देखील प्रचंड जिवंत आहे.

सुंदर परीक्षण. आत्ता हा चित्रपट पुन्हा नक्की पाहेन. पूर्ण.

सुहास झेले म्हणाले...

ओहहहह... भयंकर. हा बघतोच लवकरचं !!

मस्त लिहिलंय परीक्षण :)

sanket म्हणाले...

मी बघितलाय हा चित्रपट ! भयंकर पण वास्तव चित्रण आहे, मेल गिब्सनच्या प्रतिमेला साजेसे. मला आवडला होता.

Unique Poet ! म्हणाले...

सिध्दार्थ.... तू बर्‍याच उशीरा पाहण्यास सुरूवात केलीस तरी..!
आधीचाही भाग खूप जबरा आहे... नक्की पूर्ण बघ ... प्रतिसादासाठी आभार !

अरे सुझे...... काही दृश्ये इतकी भयंकर अंगावर येतात... मला काही दिवस तर सारखी ती डोळ्यासमोर यायची... अजुनही... आठवण झाली की येतात.. नक्की नक्की बघ हा चित्रपट ! आणि आभार्स ! :)

संकेत खरोखरीच त्यात खूपच वास्तव...चित्रण आहे.. आस्तेक संस्कृती पासून सर्वच....
मेल गिब्सन खूप डिटेलिंग मध्ये शिरलाय.... !
प्रतिसादासाठी धन्स ! :)

davbindu म्हणाले...

वरील वर्णन वाचून तरी पहावासा वाटतोय ,लवकरच पाहीन ...

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

खरे तर चित्रपट वा चित्रपटपरीक्षण मला फारसे आवडत नाही. पण दोन ओळीत आपण वाचकाचा जो ताबा घेतला तो आश्चर्यकारक आहे. आता मी हा चित्रपट पाहाणारच. जीएं च्या रानातील प्रकाश या रूपांतरित कादंबरीची आठवण झाली.

Sonal म्हणाले...

Coming soon on Movies Now
Enjoy!!!

सुहास झेले म्हणाले...

समीर, बघितला रे अ‍ॅपोकॅलिप्टो !!!!

भयंकर आहे.. धन्स ह्या उत्कृष्ठ परीक्षणाबद्दल :) :)

Unique Poet ! म्हणाले...

देवेन ... जरूर बघ ..... सही आहे ... आभार्स ! :)

कांदळकर काका..... आपल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद ! मी पहिल्यांदाच चित्रपट परिचय लिहीला आहे .... हे काही रसग्रहण वगैरे नाही..... त्यामुळे फारश्या उत्साह वर्धक प्रतिसादांची अपेक्षा नव्हती खरी.... पण प्रयत्न अगदीच वाईट ठरला नाही ... हे ही नाही थोडके... बाकी चित्रपट जरूर पाहा ! :)

सोनल धन्यवाद ! :)

सुझे ... मजा आली ना ..! ;)

मंदार जोशी म्हणाले...

बघायला हवा