जादुई काडया !


आठवणींचे पागोळे, स्वप्नांच्या  होड्या
झुलत झुलत काढती, एकमेकांच्या खोड्या

काजव्यांची चमचम, बेडूकरावांच्या उड्या
ऊनपावसात रिमझिम, उघडती बंद कड्या

ओलेती वसुंधरा, जलद नेसवी साड्या
बागडती मुले, फुले, घेउनी हिरव्या लड्या

वसंताचा  रामराम, वर्षाला  पडती खळ्या
कोण कुठे कोण कुठे, पाहती उमलत्या कळ्या

विरून गेली लाही लाही, फिरती  जादुई काड्या
दृष्टी कशी बदले सारी, वाहती शांतीच्या नद्या

कवयित्री: अलका काटदरे

९ टिप्पण्या:

सुहास झेले म्हणाले...

वाह सुंदर !!

Unique Poet ! म्हणाले...

छान वर्णन.... !

Harsha Swami म्हणाले...

सुंदर!!

davbindu म्हणाले...

मस्तच ...

दीपक परुळेकर म्हणाले...

खरंच हे शब्द जादुच्य काड्या आहेत.
छान :)

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

जादुई काड्या हे अगदी पटले. छान.

Vinayak Pandit म्हणाले...

खूपच छान!:)

ulhasbhide म्हणाले...

आवडली

Alvika म्हणाले...

सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद.