आभाळहे भरून आलेलं आभाळ
काही केल्या रितं होत नाही..
पुन्हा पुन्हा बरसून सुद्धा,
समाधान त्याचं होत नाही,
एक पाऊल पुढे टाकून,
त्यालाही मोकळ्या आभाळात मिसळायचंय...
पण पूर्ण रितं झाल्याशिवाय,
त्याला पुढं जाता येत नाही...

कवयित्री: हर्षा पुष्कराज स्वामी