१) कधीकाळचे दाटून येते
डोळा पाणी....
आठवणींची हळवी ओली
स्मरता गाणी....
२) माणूस नामक गर्दी मजला
वेढून राही....
एकाकीपण तरीही माझे
संपत नाही....
३) अवघडलेपण येते मजला
अशाच वेळी....
सांगायाचे जेंव्हा तुजला
सारे काही....
४) मला कळाले आज अताशा
कविते विषयी....
उत्स्फूर्ताचे गीत भिडतसे
कवी: समीर पु.नाईक
१० टिप्पण्या:
थोडक्यात महत्वाचा आशय देणार्या चारोळ्या .... आवडल्या
सही.. आवडल्या :) :)
छान आहेत चारोळ्या !!!!
छान !!आवडल्या !
भिडेकाका..सुझे..जीवनिका..आणि संकेत.... मनापासून आभार !
मस्तच रे आवडल्या ...
अप्रतिम चारोळ्या! खासच.
पहिल्या दोन आवडल्या.
पुन्हा आभार्स रे देवेन ! :)
क्रांतीताई .... मनापासून धन्यवाद :)
कांदळकर काका.... मनापासून धन्यवाद :)
टिप्पणी पोस्ट करा