पृष्ठे

▼

पाऊस आणि मी

तुझ्या  स्वागतासाठी
हिरवाईने नटते अवघी सृष्टी
आम्ही आलो काय, गेलो काय
दिसतात तेच चेहरे दु:खी कष्टी
.
तू आपल्या मर्जीचा मालक
पाहिजे तेव्हा पाहिजे तसा येतो
आम्ही मात्र अजाण बालक
आयुष्याचा गाडा कसातरी पुढे नेतो
.
तू कसाही कोसळलास तरी
कोणीतरी पाहतच असते  तुझी  वाट
कोणासाठी कितीही केलं तरी
आमची नेहमी लागत असते वाट
.
पण तू सोबतीला असलास की मला
उगाच हसायचे सोंग घ्यावे लागत नाही
तुझी  साथ मग हवीशी वाटते, कारण
तेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही
.
मग कधी माझं दु:ख जाणवल्यावर
तू वेड्यासारखा  कुठेही पडत असतोस
आणि माझे अश्रू सुकले तरी
तू मात्र नेहमीच रडत असतोस

कवी: देवेंद्र चुरी

१२ टिप्पण्या:

  1. लई भारी कविता भावा,
    जरा रेग्युलर लिवत रावा...!!

    उत्तर द्याहटवा
  2. हेरंब ,धन्स यार ....

    सुझे ,जरूर प्रयत्न करू रेग्युलर लिवायचा ... :)

    उत्तर द्याहटवा
  3. लईच !
    मस्त कविता भावा !!
    शेवटच्या ओळी जाम आवड्या! :)

    उत्तर द्याहटवा
  4. लईच !
    मस्त कविता भावा !!
    शेवटच्या ओळी जाम आवड्या! :)

    उत्तर द्याहटवा
  5. दीपक ,धन्स रे भावा...
    क्रांतीताई, तुझ्याकडून खास अशी प्रतिक्रिया मिळणे मी माझा बहुमान समजतो....

    उत्तर द्याहटवा
  6. "तुझी साथ मग हवीशी वाटते, कारण
    तेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही"

    या ओळी चार्ली चॅप्लीनच्या एका वचनाची आठवण देऊन गेल्या. बाकी कविता मस्तच. लिहित रहा रे !

    उत्तर द्याहटवा
  7. "I always like walking in the rain, so no one can see me crying."
    — Charlie Chaplin

    चार्लीची फिलॉसॉफी जबरदस्तच आहे ...

    प्रतिक्रियेबद्दल धन्स श्रेयाताई, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद असल्यावर नक्कीच लिहित राहीन ..

    उत्तर द्याहटवा