तुझ्या स्वागतासाठी
हिरवाईने नटते अवघी सृष्टी
आम्ही आलो काय, गेलो काय
दिसतात तेच चेहरे दु:खी कष्टी
.
तू आपल्या मर्जीचा मालक
पाहिजे तेव्हा पाहिजे तसा येतो
आम्ही मात्र अजाण बालक
आयुष्याचा गाडा कसातरी पुढे नेतो
.
तू कसाही कोसळलास तरी
कोणीतरी पाहतच असते तुझी वाट
कोणासाठी कितीही केलं तरी
आमची नेहमी लागत असते वाट
.
पण तू सोबतीला असलास की मला
उगाच हसायचे सोंग घ्यावे लागत नाही
तुझी साथ मग हवीशी वाटते, कारण
तेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही
.
मग कधी माझं दु:ख जाणवल्यावर
तू वेड्यासारखा कुठेही पडत असतोस
आणि माझे अश्रू सुकले तरी
तू मात्र नेहमीच रडत असतोस
कवी: देवेंद्र चुरी
कवी: देवेंद्र चुरी
देवेन इज बॅक वुईथ बँग..
उत्तर द्याहटवामस्तच कविता रे..
लई भारी कविता भावा,
उत्तर द्याहटवाजरा रेग्युलर लिवत रावा...!!
हेरंब ,धन्स यार ....
उत्तर द्याहटवासुझे ,जरूर प्रयत्न करू रेग्युलर लिवायचा ... :)
लईच !
उत्तर द्याहटवामस्त कविता भावा !!
शेवटच्या ओळी जाम आवड्या! :)
लईच !
उत्तर द्याहटवामस्त कविता भावा !!
शेवटच्या ओळी जाम आवड्या! :)
खूपच खास! शेवट झकास.
उत्तर द्याहटवादीपक ,धन्स रे भावा...
उत्तर द्याहटवाक्रांतीताई, तुझ्याकडून खास अशी प्रतिक्रिया मिळणे मी माझा बहुमान समजतो....
"तुझी साथ मग हवीशी वाटते, कारण
उत्तर द्याहटवातेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही"
या ओळी चार्ली चॅप्लीनच्या एका वचनाची आठवण देऊन गेल्या. बाकी कविता मस्तच. लिहित रहा रे !
"I always like walking in the rain, so no one can see me crying."
उत्तर द्याहटवा— Charlie Chaplin
चार्लीची फिलॉसॉफी जबरदस्तच आहे ...
प्रतिक्रियेबद्दल धन्स श्रेयाताई, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद असल्यावर नक्कीच लिहित राहीन ..
खूप छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवाधन्स महेश ....
उत्तर द्याहटवाछान ... शेवटचं कडवं अधिक आवडलं.
उत्तर द्याहटवा