पृष्ठे

चारोळ्या .... !

१) कधीकाळचे दाटून येते
   डोळा पाणी....
   आठवणींची हळवी ओली
   स्मरता गाणी....

२) माणूस नामक गर्दी मजला
   वेढून राही....
   एकाकीपण तरीही माझे
   संपत नाही....

३) अवघडलेपण येते मजला
   अशाच वेळी....
   सांगायाचे जेंव्हा तुजला
   सारे काही....

४) मला कळाले आज अताशा
   कविते विषयी....
   उत्स्फूर्ताचे गीत भिडतसे
   नेहमी हृदयी....
   
             कवी: समीर पु.नाईक

१० टिप्पण्या:

  1. थोडक्यात महत्वाचा आशय देणार्‍या चारोळ्या .... आवडल्या

    उत्तर द्याहटवा
  2. भिडेकाका..सुझे..जीवनिका..आणि संकेत.... मनापासून आभार !

    उत्तर द्याहटवा
  3. पुन्हा आभार्स रे देवेन ! :)

    क्रांतीताई .... मनापासून धन्यवाद :)

    कांदळकर काका.... मनापासून धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा