प्रिय पावसास,
तुझी
मैथिली...
लेखिका: मैथिली प्रधान
खरेतर मायना 'प्रिय पाऊस यांस' असा असायला हवा होता. पण मग ते खूप फॉर्मल आणि परफेक्ट झाले असते ना. अॅंड आय डू नॉट लाईक परफेक्ट. आणि म्हणूनच तू आवडतोस मला. टोटली इमपरफेक्ट. :-)
येण्या-जाण्याची वेळ ठरलेली नसलेला, कधी अनपेक्षितपणे टपकून धांदल उडवणारा तर कधी नक्की येशील असे वाटत असताना न येऊन पोपट करणारा...
कित्ती शिव्या खातोस ना तू ह्या वागण्या पायी...कधी कधी राग ही येत असेल तुला, पण तुला तर माहित्येय ना...जो आपल्या खूप जास्त जवळचा असतो त्यालाच तर शिव्या घालतो न आपण. कित्तीही बोलले न तुला हे सगळे, तरी मनातून प्रेम करतात रे तुझ्या वर. :-)
(उगाच का पहिल्या पावसात मातीचा वास भरून घेतात श्वासात, खिडकी बाहेर हात काढून तुझे थेंब मुठीत साठवण्याचा प्रयत्न करतात...)
त्यामुळे डोंन्ट यू वरी...इथले सगळेच प्रेम करतात तुझ्या वर...फरक इतकाच आहे...की कोणी ते व्यक्त करते...तर कोणी करत नाही.
असो...गाव गप्पा खूप झाल्या. हे काही "प्रातिनिधिक पत्र" वगैरे नाहीये...माझे पर्सनल लेटर आहे हे, तुला थॅंक यू म्हणण्या साठी. मला माहित्येय, आभार वगैरे परक्यांचे मानतात...पण आपल्यांनाही कधी तरी थँक्स म्हणावे की. छान वाटते... म्हणणार्यालाही आणि ऐकणार्यालाही. :-)
तर...थॅंक यू सो मच...कित्ती काय काय केलेयस तू माझ्या साठी. शाळेला सुट्ट्या मिळवून दिल्यास, पिकनिक साठी कारणं दिलीस, बर्रेच काही सुचवून गेलास, बर्रेच काही शिकवून गेलास. तर कधी आधार दिलास. मला चांगले आठवतंय, माझी आजी गेली तो दिवस.
'मरणे' म्हणजे काय असते हे ही माहीत नव्हते. काहीच कळत नव्हते. ते सगळे विचित्र सोपस्कार, इतकी माणसे, पहिल्यांदाच बघत होते. आई, बाबा, काका, असे का वागतायत, आजी परत येणार नाही म्हणजे नक्की कुठे गेलीये...इथेच तर आहे न ती, मग परत न येण्याचा प्रश्नच काय, खूप खूप कन्फ्यूजन होते. सगळेच अनोळखी वाटत होते. पण तेवढ्यातही तुझ्या येण्याने कित्ती आधार मिळाला मला.
सगळे वेगळे होते...तरी तू तसाच होतास.
आजही...तू तसाच आहेस...जसा गेली कित्येक वर्षे होतास. कधीच नाही बदललास तू. आणि त्या बद्दलही थॅंक्स... :-)
तुला देता येण्यासारखे काहीच नाहीये आत्ता माझ्या कडे. ( लहानपणी खोटे पैसे असायचे, आता "व्यापार" हरवला रे माझा. ते खोटे पैसे ही हरवले. तुझ्यासारखे राहून नाही न चालत आम्हाला. बदलावे लागते. :-) )
पण तुला त्याने काही फरक पडत नाही हे ठाऊक आहे मला. :-)
देण्या घेण्याचे व्यवहार तू कधी शिकलाही नाहीस आणि शिकणारही नाहीस. माहित्येय मला.
सो...थॅंक्स अ टन.. विथ... लॉट्स ऑफ लव... :-)
लेखिका: मैथिली प्रधान
मस्तच गं मैथिली ! पावसाला थॅंक्स बिंक्स म्हणायचं कधी सुचलंच नाही बघ मला.
उत्तर द्याहटवाव्वा ! बच्चू फार सुंदर हां !
उत्तर द्याहटवाखरचं हा पाउस किती शिव्या खातो ना आपल्याकडून :):):)
बट वी ऑल लव्ह इट लाएक एनिथिंग !
एंजॉय द रेन !
वाह मैथिली..मस्तचं गं !!
उत्तर द्याहटवामस्तच.. आवडलं...
उत्तर द्याहटवा.
.
.
.
तरीही माझं मत ठाम आहे :P
हेहे .. सुंदर लिहिलंय.. अगदी नैसर्गिक, आपण जसा मित्रासोबत संवाद साधतो ना तसा..उगाच अवजड साहित्यिक शब्दांचे बोजे नाही.. मनातले वाटते. :)
उत्तर द्याहटवारच्याक ,सत्यवाना, कोणते मत रे भावा ?? ;)
खुप आधी लहानपणी कधी तरी आजीने सांगीतले होते की पाऊसाला त्याच्या आई ने शाप दिला होता कि तु आला तरी लोक तुला शीव्या घालणार आणी नाही आला तरी घालणार(वाईटच बोलणार) तेव्हा पसुन कितीही काहीही झाले तरी पाऊसाला वाईट किव्हा शीवी दिली नाही.
उत्तर द्याहटवामैथीली लहान पणाचे दिवास आठवले आणी आजीची पण आठवण आली बघ. खुप छान ग
तू जरी म्हटल्यास कि हे प्रातिनिधिक पत्र नाहीये तरीपण हे पत्र मीच लिहिलाय अस वाटत होत मला.... :)
उत्तर द्याहटवाबाकी पाउस आपला पण एकदम जिगरी आहे हं...
मैथिली! खूपच आवडलं हे पत्र! छानच!
उत्तर द्याहटवाThank You... :-))
उत्तर द्याहटवा