हसतोस काय? ये ना, धरती मिठीत घे ना
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
नुसत्याच चाहुली का? आभाळ फक्त काळे
हृदयात दाटलेले विरतील पावसाळे
अधिर्या तनामनाची ही आग सोसवे ना
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
हळुवारशा सरींनी शिंपीत ये धरे ला
कल्लोळ घेउनी वा पेटून ये इरेला
उजळून देत ये की उधळून देत ये ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
गर्भातल्या बिजांना फुटतील कों ब ताजे
हिरवाळतील राने, बहरेल स्वप्न माझे
दे चातकास तृप्ती, मयुरास नाचु दे ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
हो, तेच थेंब अन् त्या वेड्याखु ळ्या सरीही
नसले नवीन काही, असते हवे तरीही
तू भेटसी नव्याने, इतके कसे कळे ना?
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
कवयित्री: क्रांति साडेकर
सुंदर !!!! क्या बात है !
उत्तर द्याहटवागर्भातल्या बिजांना फुटतील कोंब ताजे
उत्तर द्याहटवाहिरवाळतील राने, बहरेल स्वप्न माझे
दे चातकास तृप्ती, मयुरास नाचु दे ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
सुंदर.. खुप आवडली !!
असं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल. अतीशय सुंदर,सहज आणि आशयघन.
उत्तर द्याहटवा"नसले नवीन काही, असते हवे तरीही
तू भेटसी नव्याने, इतके कसे कळेना?"
या ओळी सर्वात जास्त भावल्या.
असं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल...+१
उत्तर द्याहटवासहज, सुंदर कविता आवडली ...
मस्तच !
उत्तर द्याहटवासहज बोलवावं तसं सुंदर आवाहन आहे हे ! :)
‘तू भेटसी नव्याने’ हे किती सार्थ आहे. कविता वाचून शृंगाराची ओढ हा विषय कधीही नवानूतनच राहातो आणि राहील असे वाटत राहिले. त्याच विषयावरची एक प्रसन्न ताजी, टवटवीत कलाकृती. वा!
उत्तर द्याहटवावा! छानच आहे कविता. कोणीतरी याला छानशी चाल लावली तर सुंदर गाणे बनेल.
उत्तर द्याहटवाअसं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल.
उत्तर द्याहटवाखरेच ..
खूप सुरेख ... :)
छानच! कुणी चाल लावली तर मस्त गीत जमून येईल!
उत्तर द्याहटवामंडळी, हे काव्य वाचल्यावर मला लगेच त्याची चाल सुचली. पहा योग्य आहे का ? मी गायिका / संगीतकार नाही पण चाल सुचली,गाविशी वाटली म्हणून त्याचा दुवा इथे देत नाही. गोड मानून घ्या - http://www.divshare.com/download/15127470-7fc
उत्तर द्याहटवामंडळी, हे काव्य वाचल्यावर मला लगेच त्याची चाल सुचली. पहा योग्य आहे का ? मी गायिका / संगीतकार नाही पण चाल सुचली,गाविशी वाटली म्हणून गोड मानून घ्या.
उत्तर द्याहटवाआधीचा दिलेला दुवा काम करत नाहिये. हा घ्या नवीन दुवा. http://www.youtube.com/watch?v=T6Q8CByUUa4
सगळ्यांना धन्यवाद!
उत्तर द्याहटवाश्रेयाताई, मस्तच जमलीय चाल. मला खूप आवडली. मी पण पाठ करीन.